६०० रुबिक्स क्यूबमधून विराट कोहलीला अनोखी मानवंदना

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : ६०० रुबिक्स क्यूबमधून विराट कोहलीला अनोखी मानवंदना दिली आहे. शहरातील १३ वर्षीय क्रिकेटप्रेमी विराट कडगावकरने आपल्या आवड त्या क्रिकेटपटू विराट कोहलीला अनोखी मानवंदना दिली आहे. 

तब्बल ६०० रुबिक्स क्यूब्स वापरून त्याने विराट कोहलीचा आकर्षक मोझेंक तयार केला आहे. हे कलात्मक काम पाहून सर्वत्र कौतुक होत आहे. लहान वयातच रुबिक्स क्यूब आर्टमध्ये विशेष आवड असलेल्या विराटने पाच दिवस मेहनत घेऊन हा भव्य मोॉक साकारला. 

प्रत्येक क्यूबची रंगसंगती आणि मांडणी अचूक जुळवत त्याने कोहलीचा चेहरा जिवंत भासेल असा उमा केला आहे. या कलाकृतीद्दल सोशल मिडीयासह समाजामध्ये कौतूक होत आहे.